किरण यादव

डिझायनर लीड, एमआरसीसी आईटी सोल्युशन ठाणे,

मराठी माजी विद्यार्थी (२०१२-२०१५)

   महाविद्यालयाविषयीचा अनुभव एका वाक्यात सांगायचं तर “पुन्हा ते दिन येणे नाही” असंच मी म्हणेन. मी खरोखरीच स्वतः ला भाग्यवान समजतो की मला असं कॉलेज, उत्कृष्ट शिक्षकवृंद गुरु स्थानी लाभले. केवळ अभ्यासक्रमाच्या गोष्टी शिकवणारी अनेक महाविद्यालय आहेत. पण जगणं आणि त्याही पलीकडे एक उत्तम माणूस, सुजाण नागरिक म्हणून कसं जगावं हे मला इथल्या माझ्या शिक्षकांनी शिकवलं. शालेय जीवनात आपल्याला फक्त बरी चित्रंच काढता येतात म्हणून चित्रकलेत भाग घेणारा मी इकडे मात्र कविता, गाणं, वक्तृत्व इत्यादी महाविद्यालयीन, आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा देखील जिंकू लागलो. आणि हे केवळ आणि केवळ माझ्या आदरणीय शिक्षकांच्या पाठिंब्यामुळे शक्य झाले. तो काळ, ती माणसं माझ्यासाठी मला आयुष्यभर पुरेल एवढी ज्ञानाची, प्रेमाची शिदोरी आहेत हे नक्की.

Skip to content