सारिका राजेश ढेरंगे

फ्री लान्स लेखक - कविता, कथा, लेख लेखन, ,

मराठी माजी विद्यार्थी (२००४-२००७)

मी बारावी सायन्स ची विद्यार्थिनी होते पण माझा लिखाणाकडे कल असल्यामुळे मी कलाशाखेत मराठी विषय घेतला होता .  त्यामुळे अनेक साहित्यिक मला अभ्यासता आले. त्याचा मला माझ्या लिखाणामध्ये खूप फायदा झाला कारण पुस्तक वाचून आपलं स्वतःच त्याविषयी एक मत तयार होते. पण ते अभ्यासक्रमात साहित्य म्हणून शिकल्यामुळे शिक्षकांचे तसंच आपल्या सोबत असणाऱ्या इतर मित्र-मैत्रिणींचीही त्यावरची मत आपल्याला कळतात आणि आपण आपल्या एकाच चाकोरीतून बाहेर पडून सगळ्या गोष्टींकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहतो. कॉलेजमध्ये अनेक स्पर्धा घेतल्या जातात. मी त्यात फार कधी भाग घेतला नाही कारण माझ्याकडे फार आत्मविश्वास नव्हता पण मला आठवतंय की स्नेहा आणि नीलांबरी मॅडमने माझ्यावर विश्वास दाखवत मला वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायला लावला.मी त्या स्पर्धेत भाग घेतला आणि जिंकलेसुद्धा ! तो प्रसंग माझ्यासाठी नेहमीच स्मरणात राहिला कारण तो प्रसंग माझा आत्मविश्वास वाढवणारा होता. असे अनेक अनुभव आहेत ज्यांचा माझ्या जडणघडणीत वाटा आहे . शिक्षक विद्यार्थ्यांना घडवतात, असे म्हटले जाते. ते खरोखरच खरे आहे. कॉलेजने मला खूप छान मित्र-मैत्रिणी दिले.ज्यांच्यासोबत आजही मी संपर्कात आहे. आजही बाहेर कुठे विचारलं की तुम्ही कुठल्या कॉलेजमध्ये  शिकलात तर जेव्हा झुनझुनवाला कॉलेजच नाव घेते  तेव्हा लोक खूप आदराने बघतात. झुनझुनवाला कॉलेजमध्ये माझं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल आहे हीच खरे तर माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे.

Skip to content